कडबा कुट्टी मशीन योजना: Kadba kutti Machine Yojana 2023

शेतकरी बांधवांसाठी एक उपयोगी अशी योजना महाराष्ट्र शासनातर्फे सुरू करण्यात आलेली आहे, या योजनेचे नाव आहे Kadba Kutti Machine Yojana 2023 बरेच शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन दूध विक्री व्यवसाय असे व्यवसाय हे करत असतात. पशुपालन करत असताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामध्ये जनावरांसाठी चारा बारीक करण्यासाठी शेतकऱ्यांना मेहनत घ्यावी लागते. याच मेहनतीला कमी करण्यासाठी सरकारद्वारे ही कडबा कुट्टी मशीन योजना 2023 अमलात आणलेली आहे.

Kadba Kutti Machine Yojana 2023; योजनेमध्ये किती अनुदान मिळेल आणि या योजनेचा किती प्रमाणात लाभ होईल या  योजनेसाठी ची पात्रता अशी बरीचशी महत्त्वपूर्ण माहिती आम्ही देत आहोत त्यासाठी हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचावा.

कडबा कुट्टी मशीन योजना (Kadba Kutti Machine Yojana)

शेतकरी हे शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय करत असतात या पशुपालन व्यवसायासाठी कडबा कुट्टी मशीन हे उपयोगी असे मशीन आहेत. सर्वच शेतकऱ्यांना , पशुपालन करणाऱ्यांना हे मशीन घेणे शक्य होत नाही. जर त्या शेतकऱ्यांकडे Kadba Kutti Machine Yojana असेल तर त्या शेतकऱ्याचे कष्ट हे कमी होतील आणि त्यांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जनावरांना बारीक झालेले खाद्य हे मिळू शकते.

राज्यांमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती ही हलाखीची असल्यामुळे त्यांना हे कडबा कुट्टी मशीन खरेदी करणे परवडत नाही. याच गोष्टीचा विचार करून राज्य सरकारने महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी kadba kutti machine scheme 2023 ( चाफ  कटर मशीन )अनुदान योजना ही राबवली जात आहे.

कडबा कुट्टी साठी 2 मशीन बाजारात उपलब्ध आहेत

1] मनुष्य चलित कुट्टी :- कडबा कुट्टी मशीन योजना अंतर्गत राज्य सरकारच्या द्वारे शेतकऱ्यांना किमतीच्या 50% एवढे अनुदान मिळते.

Kadba Kutti Machine Yojana

जर तुम्ही दहा हजार रुपयांची  मनुष्य चलित कडबा कुट्टी ही घेतली तर त्या योजनेमार्फत तुम्हाला त्याचे 50 %म्हणजेच 5 हजार रुपये हे तुम्हाला योजनेतर्फे मिळणार आहेत. मनुष्य चलीत कडबा कुट्टी मशीन ची किंमत ही कमी असते.

2] ट्रॅक्टर वर चालणारे कुट्टी मशीन :- ट्रॅक्टर वर चालणारी  इलेक्ट्रिक कडबा कुट्टी मशीन ही जास्त किमतीची असते ,

तुम्ही जर ट्रॅक्टर वर चालणारे इलेक्ट्रिक कडबा कुट्टी मशीन जर खरेदी केली तर  ती मशीन तुम्हाला 40 हजार रुपयाला मिळते तर या मशीनच्या 50% किंमत म्हणजेच तुम्हाला 20 हजार रुपये इतके योजनेतर्फे अनुदान मिळते.

कडबा कुट्टी मशीन योजना उद्देश

शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय ,पशुपालन असा व्यवसाय करत असतात. अशा व्यवसायात जनावरांसाठी हिरवा चारा, सुकलेला चारा यांना कापण्यासाठी शेतकऱ्याला जास्त मेहनत घ्यावी लागते.

शेतकऱ्याचे मेहनती कमी करण्याच्या उद्देशाने या Kadba Kutti Machine Yojana ही अमलात आलेली आहे. शेतकऱ्याचा वेळ वाचावा आणि शेतकऱ्याला पशुपालन व्यवसाय मदत मिळावी

कडबा कुट्टी मशीन योजनाचे  लाभ ( Kadba Kutti Machine Yojana Benefits)

  • शेतकऱ्यांना पशुपालन करताना खूप सारे अडचणींना सामोरे जावे लागते जनावरांना साठी हिरवा चारा, सुकलेला चारा बारीक करताना मेहनत घ्यावी लागते. जर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी कुटी मशीन चा लाभ घेतला तर त्या शेतकऱ्याचे शारीरिक कष्ट कमी होईल आणि आर्थिक उत्पन्न हे वाढेल. 
  • शेतकऱ्याच्या चाऱ्याची नासाडी  कमी होऊन चाऱ्याचे योग्य प्रमाणामध्ये व्यवस्थापन करता येईल.
  • कुट्टी मशीन मध्ये चारा बारीक केल्यामुळे तो चारा कमी जागेमध्ये साठवून ठेवता येतो.
  • कडबा कुट्टी मशीन हे विद्युत मोटर च्या साह्याने चालत असल्यामुळे कमी वेळेमध्ये जास्त चारा कापणी करता येतो.
  • कडबा कुट्टी मशीन ने कडबा बारीक केल्यामुळे जनावरांना  तो खाण्यासाठी सोयीस्कर होतो.
  • कडबा कुट्टी मशीन मनुष्य बळ हे कमी लागते परिणाम शेतकऱ्याची वेळची बचत होते आणि मेहनती ची सुद्धा बचत होते.
  • या योजने मुले आर्थिक परिस्थितीने गरीब अशा शेतकऱ्यांना कुट्टीचे मशीन  घेणे शक्य होईल.
  • जाड चारा हा कमी वेळेत बारीक होऊन जनावरांसाठी लवकर मिळणे शक्य होते.

कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे

  1. कडबा कुट्टी या योजनेसाठी अर्ज करणारा लाभार्थी हा ग्रामीण भागातील रहिवासी असावा.
  2. अर्जदार हा शेतकरी असणे आवश्यक आहे.
  3. अर्जदाराचा सातबारा उतारा आणि आठ अ उतारा.
  4. जो शेतकरी या योजनेसाठी अर्ज करत असेल त्या शेतकऱ्याच्या नावा वर चार हेक्टर पेक्षा जास्त ची जमीन नसावी.
  5. अर्जदाराचे आधार कार्डची झेरॉक्स
  6. बँकेच्या पासबुकची झेरॉक्स
  7. बियाणे बिल

कडबा कुट्टी मशीन योजना पात्रता {Kadba Kutti Machine Yojana}

तुम्हाला या Kadba Kutti Machine Yojana योजनेचा फायदा जर घ्यायचा असेल तर पुढील पात्रता असणे आवश्यक आहे.

  • अर्ज करणारी व्यक्ती ही महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करणारे व्यक्तीचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
  • अर्ज दाराकडे 4 हेक्टर पेक्षा जास्त जमीन नसावी.
  • अर्ज करणारे व्यक्तीचे बँक खाते हे आधार कार्डशी लिंक असावे. 
  • अर्ज करणारे व्यक्ती ही ग्रामीण भागातील असावी.
  • अर्जदाराचे रहिवासी प्रमाणपत्र असावे.

कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी अर्ज कसा करावा

  • Kadba Kutti Machine Yojana साठी अर्ज करताना सर्वप्रथम तुम्हाला लेखामध्ये जी कागदपत्रे सांगितलेली आहे ती तुम्ही सर्व तयार ठेवायची आहेत.
  • अर्ज करण्यासाठी mahadbtmahait ही वेबसाईट टाकून क्लिक करायचे आहे.
  • या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलेले नसेल तर आधी रजिस्ट्रेशन करून घ्यावे.
  • जर तुम्ही यापूर्वी कोणत्याही घटकासाठी अर्ज केलेला असेल तर लॉग इन करून कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत या योजनेसाठी अर्ज करू शकता.
  • लॉगिन केल्यानंतर तुम्हाला अर्ज करा अशा ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.
  • क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी चार पर्याय दिसतील त्यामध्ये तुम्हाला यांत्रिकीकरण ,सिंचन साधने सुविधा बियाणे , औषधे व खते आणि फलोउत्पादन इत्यादी पर्यायांपैकी तुम्हाला कृषी यांत्रिकीकरण हा पर्याय निवडायचा आहे आणि त्यावर क्लिक करायचे आहे.
  •  पुढे तुम्हाला खरेदीसाठी अर्थसाहाय्य योजनेवरती क्लिक करायचे आहे.
  • क्लिक केल्याच्या नंतर मनुष्यचलित अवजारे या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • यापुढे यंत्र सामग्री अवजारे या अंतर्गत शेवटचा पर्याय( forest grass and data Residue management)या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर पुढे कडबा कुट्टी मशीन कशा प्रकारची हवी आहे असा पर्याय येईल त्यामध्ये तुम्हाला चाफ कटर तीन पेक्षा जास्त कटर ,तीन पेक्षा कमी , फीड ब्लॉक मशीन तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार मशीन घेऊ शकतात यासाठी तुम्ही कृषी सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करू शकतात.
  • आता सेव्ह या पर्यायावर क्लिक करा. या नंतर तुम्ही पेमेंट करून पावती मिळू शकतात.

FAQ; कडबा कुट्टी मशीन {Kadba Kutti Machine Yojana}

कडबा कुट्टी मशीन योजना अंतर्गत किती अनुदान मिळेल?

योजने अंतर्गत कडबा कुट्टी मशीन खरेदी करण्यासाठी 50 टक्के अनुदान हे योजनेतर्फे मिळेल.

Kadba Kutti Machine Yojana ऑनलाईन अर्ज वेबसाईट कोणती आहे?

या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट Mahadbtmahait  ही आहे.

कडबा कुट्टी मशीन ही योजना कोणा द्वारे सुरू करण्यात आलेली आहे?

ही योजना कृषी विभागाद्वारे सुरू करण्यात आलेली आहे.

कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी पात्र कोण ठरतील?

या योजनेसाठी ग्रामीण भागातील शेतकरी हे पात्र ठरतील.

कडबा कुट्टी मशीन योजनेचा फॉर्म कोणत्या पोर्टल वर अपलोड करायचा आहे?

या योजनेचा फॉर्म महाडीबीटी पोर्टल वर अपलोड करायचा आहे.

Kadba Kutti Machine Yojana – या योजना विषयी काही माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व यासारख्या Free Sarkari Yojana ची माहिती इतरांनाही शेअर करा..

धन्यवाद..✍️

हेही वाचा:~

Shadi Anudan Yojana 2023

Shabari Gharkul Yojana Yadi 2023

Anganwadi Bharti Form 2023

Birsa Munda Loan Yojana

Leave a Comment