लेक लाडकी योजना महाराष्ट्र : Lake ladki Yojana Maharashtra 2023

Lake ladki Yojana : महाराष्ट्र सरकार हे मुलींच्या सशक्तीकरणासाठी आणि मुलींना आर्थिक रूपाने स्वावलंबी बनवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. राज्य सरकार द्वारे मुलींसाठी बऱ्याच योजना राबवल्या जातात. राज्य सरकारने 2023 ला  महाराष्ट्रातील लेकींच्या सशक्तीकरणासाठी आणि  शिक्षणासाठी मंत्रिमंडळ द्वारे लेक लाडकी योजना 2023 या योजनेचा निर्णय घेण्यात आला आहे.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस  हे पण त्या बैठकीत उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प जाहीर करताना या योजनेची घोषणा केली होती. 

महाराष्ट्रातील आर्थिक दृष्टीने मागास वर्ग आणि गरीब मुलींना महाराष्ट्र शासनातर्फे शिक्षणासाठी आणि विवाह साठी अर्थसहाय्य दिले जाणार आहे. या योजनेमुळे स्त्रीभ्रूण हत्येचे प्रमाण रोखणे शक्य होईल आणि  महाराष्ट्रातील बाल विवाह प्रथा कमी होईल.

 लेक लाडकी योजना काय आहे, Lake ladki Yojana योजनेचे फायदे काय आहे, लेक लाडकी योजना साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ,लेक लाडकी योजना कागदपत्रे कोणती, अशा प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत पूर्ण वाचावा.

लेक लाडकी योजना काय आहे

महाराष्ट्र राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना शिक्षणासाठी आणि विवाहासाठी या योजनेद्वारे आर्थिक मदत देण्यात येईल. लेक लाडकी योजना ही  शासनातर्फे राबविण्यात येणारी एक सरकारी योजना आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याद्वारे महाराष्ट्राच्या च्या लेकिन साठी Lake ladki Yojana 2023 सुरू केली आहे. लेक लाडकी योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेची  घोषणा केलेली होती. गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात झालेल्या बैठकीत घेण्यात आलेला आहे.

 Lake ladki Yojana अंतर्गत मुलीच्या जन्मापासून ते मुलीचे वय 18 होईपर्यंत पाच भागांमध्ये त्या मुलीला शासनातर्फे आर्थिक मदत ही दिली जाते. मुलींच्या शिक्षणासाठी कोणतेही प्रकारची आर्थिक समस्या येणार नाही या दृष्टिकोनातून ही योजना अमलात आणलेली आहे.

Lake ladki Yojana 2023

 गरीब कुटुंबातील मुलींना उत्तम शिक्षण  चांगले आरोग्य आणि मुलींचे उज्वल भविष्य व्हावे आणि प्रत्येक मुलीला शिक्षणाची संधी प्राप्त व्हावी , प्रत्येक मुलगी ही शिक्षणाच्या क्षेत्रांमध्ये आर्थिक स्थितीने परिपूर्ण असेल असा या योजने मागचा हेतू आहे

1 एप्रिल 2023 त्यानंतर कुटुंबात जन्मलेल्या एक अथवा दोन मुलींना किंवा एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर त्या मुलींसाठी या योजनेचा लाभ घेता येईल. जर मुली जुळ्या असेल तरी या योजनेचा लाभ त्या मुलींना घेता येईल. मात्र आई-वडिलांचे कुटुंब नियोजनाचा शस्त्रक्रिया झालेली असणे आवश्यक राहील.

Lake ladki Yojana अंतर्गत मुलीचा जन्म झाल्यावर त्या मुलीला 5  हजार रुपये, पहिली मध्ये गेल्यावर त्या मुलीला 6 हजार रुपये सहावी मध्ये गेल्यावर त्या मुलीला 7 हजार रुपये अकरावी मध्ये गेल्यावर त्या मुलीला 8 हजार रुपये आणि अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्या मुलीला 75 हजार रुपये अशी एकूण रक्कम 98 हजार इतका  लाभ त्या मुलीस मिळतो.

Lake ladki Yojana Maharashtra 2023 अंतर्गत दरवर्षी 5000 एवढे लाभार्थी या योजनेचा लाभ घेतात. Lake ladki Yojana योजनेद्वारे आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना शिक्षणास आर्थिक मदत मिळेल आणि त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध होईल.

Lake ladki Yojana Maharashtra 2023 ही महाराष्ट्र राज्यातील मुलींच्या जन्मापासून ते वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत 98 हजार आर्थिक मदत देणारी एक महत्वाकांक्षी योजना आहे त्यामुळे गरीब घरातील मुली या शिक्षणाच्या उंच शिखरापर्यंत पोहोचून आपली स्वप्न ही पूर्ण करू शकतात.

Lake ladki Yojana Maharashtra 2023 highlights

🎯योजनेचे नावलेक लाडकी योजना 2023
✍️द्वारा लागू करण्यात आलीमहाराष्ट्र शासनाद्वारे
💵लाभाचे स्वरूप98 हजार रुपये
📚विभागमहिला व बालकल्याण विभाग
📑लाभार्थीकेशरी व पिवळे रेशन कार्ड
धारक कुटुंबातील मुली
🚀अर्जाची प्रक्रियाऑनलाइन /ऑफलाइन
🌐आधिकारिक वेबसाइटलवकर..
Lake ladki Yojana Maharashtra 2023 highlights

लेक लाडकी योजनेचा उद्देश्य

सरकार द्वारे प्रत्येक योजना सुरू करण्यापूर्वी त्या योजनेसाठी एक उद्देश्य हा नेहमी असतो लेक लाडकी योजनेचा उद्देश हा की राज्यातील गरीब कुटुंबातील मुलींना शिक्षणास अर्थसाह्य मिळेल आणि जन्मापासून ते मुलीच्या विवाह पर्यंत शासनाकडून आर्थिक मदत ही केली जाणार आहे ! Lake ladki Yojana योजनेद्वारे मुलींना 98हजार रुपये पर्यंतचे अर्थसहाय्य हे देण्यात येणार आहे

  • मुलींचा आर्थिक विकास व्हायला हवा आणि त्याचप्रमाणे समाजात होणारे गर्भपात ला आळा बसावा याकरिता लेक लाडकी योजना सुरू करण्यात आलेली आहे.
  • मुलींचे भविष्य हे उज्वल व्हावे आणि त्यांना बालविवाह अशा प्रथांना बळी पडू नये याच उद्देशाने Lake ladki Yojana सुरू करण्यात आलेली आहे.
  • मुलीच्या जन्माबद्दल समाजामध्ये एक सकारात्मक विचार निर्माण व्हावा आणि मुलीचे भविष्य चांगल्या प्रकारे घडावे याकरिता ही योजना आणलेली आहे.
  • मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे आणि मुलींचा जन्मदर वाढवणे मुलीचे शिक्षणास चालना देणे मुलींचे मृत्यू दर कमी करणे मुलींचे कुपोषण थांबवणे अशा कारणांसाठी ही योजना राबवण्यात येत आहे.

लेक लाडकी योजनेची पात्रता

  1. योजनेसाठी अर्ज करणारा लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
  2. इतर राज्यातील मुलींना या योजनेचा लाभ मिळवता येणार नाही .
  3. योजनेसाठी मुलीच्या नावाने बँकेमध्ये खाते असणे आवश्यक
  4.  योजनेचा लाभ मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत मिळेल.
  5. ज्या लाभार्थ्याचे राशन कार्ड हे  पिवळे व केशरी आहेत अशा कुटुंबातील मुली या योजनेसाठी पात्र  ठरतील.
  6. ही योजना फक्त महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे.
  7. मुलीचा जन्म सरकारी रुग्णालयात होणे बंधनकारक आहे.
  8. कुटुंबाचे उत्पन्न हे 1 लाख रुपये पेक्षा जास्त नसावे.

लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा

  • लेक लाडकी योजना अंतर्गत पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारक असलेल्या कुटुंबातील मुलींना मुलींसाठी या योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • मुलीचा जन्म झाल्यानंतर त्या मुलीला 5000 रुपये हे देण्यात येणार आहे.
  • मुलगी पहिली मध्ये गेल्यावर त्या मुलीला 4000 रुपये मिळणार आहे
  • मुलगी सहावी मध्ये गेल्यावर त्या मुलीला 6000 रुपये मिळणार आहे.
  • अकरावी गेल्यानंतर त्या मुलीला 8000 रुपये हे मिळणार आहे.
  • मुलगी ही 18 वर्षाची झाल्यानंतर त्या मुलीला शिक्षणासाठी किंवा विवाहासाठी 75000 इतकी रक्कम दिली जाणार आहे.
  • योजना अंतर्गत मिळालेल्या अर्थसहाय्य हे थेट मुलीच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.
  • लेक लाडकी योजनेतर्फे मुलीच्या जन्मापासून ते अठरा वर्षाचे होईपर्यंत 98 हजार रुपये हे देण्यात येतात. 
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या आई वडिलांचे कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन हे झालेले असावे अन्यथा या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • मुलीचे स्पेशल बँकेचे खाते असावे.
  • मुलीचा जन्म सरकारी दवाखान्यांमध्ये झालेला असावा.
  • कुटुंबाचे उत्पन्न हे एक लाख रुपये पेक्षा कमी असावे.

लेक लाडकी योजना कागदपत्रे

  • लाभार्थी मुलीचे आधार कार्ड 
  • लाभार्थी मुलीचे आई वडिलांचे आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • मोबाईल नंबर
  • मुलीचा जन्म दाखला

लेक लाडकी योजना फॉर्म online

Lake ladki Yojana 2023 योजनेची घोषणा ही फक्त महाराष्ट्र राज्यासाठी करण्यात आलेली आहे. या योजनेची सुरुवात अद्याप झालेली नाही त्यामुळे या योजनेसाठी नवीन नोंदणी किंवा ऑनलाईन रजिस्ट्रेशन लाभार्थ्याला करता येणार नाही.ज्या वेळेस लेक लाडकी योजनेचा अधिकृत शासन निर्णय घेतला जाईल त्यावेळी या लेक लाडकी योजना साठी तुम्ही Lek ladki yojana online registration करू शकतील.

लेक लाडकी योजनेचा ऑनलाइन अर्ज  : lek ladki Yojana online apply in Marathi

लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कसा करावा हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये येत असतो. Lek ladki Yojana online form यावर आम्ही सांगू इच्छितो की या योजनेच्या अर्ज संदर्भात शासनाद्वारे कोणतीही माहिती अद्याप जाहीर करण्यात  आलेली नाही. जेव्हा शासनाद्वारे लेक लाडकी योजनेचा अर्ज  प्रक्रियेचा निर्णय घेतला जाईल त्यावेळेस आम्ही या लेखाद्वारे तुम्हाला सुचित करून देऊ.

लेक लाडकी योजना ची अधिकृत वेबसाईट

लेक लाडकी योजना ची official website अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही त्यामुळे तुम्हाला या योजनेचा ऑनलाईन अर्ज करता येणार नाही.जर तुम्हाला social media किंवा इतर माध्यमातून कोणी अफवा पसरवत असेल तर तुम्ही त्या गोष्टींना पूर्णपणे दुर्लक्षित करा. 

ज्यावेळेस शासनातर्फे या योजनेच्या संबंधित अधिकृत वेबसाईट चा निर्णय घेतला जाईल त्यावेळेस तुम्हाला आम्ही या लेखाच्या माध्यमातून कळून देऊ.

FAQ : lek ladki Yojana 2023 in Marathi

1. लेक लाडकी योजने अंतर्गत मुलीला किती रुपये मिळतील?

लेक लाडकी योजना अंतर्गत मुलीला 98 हजार रुपये देण्यात येणार आहे येणार.

2. लेक लाडकी योजना कोणा द्वारे सुरू करण्यात आलेली आहे?

लेक लाडकी योजना ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याद्वारे सुरू करण्यात आलेली आहे.

3. लेक लाडकी योजना कोणत्या विभागाद्वारे सुरू करण्यात आलेली आहे?

लेक लाडकी योजना महिला व बालकल्याण विभागा द्वारे सुरू करण्यात आलेली आहे.

4. लेक लाडकी योजना चा लाभ कोणत्या मुलींना मिळणार आहे?

लेक लाडकी योजना चा लाभ 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना मिळणार आहे.

5. लेक लाडकी योजनेचा अर्ज कोणत्या पद्धतीने करायचा आहे?

लेक लाडकी योजनेचा अर्ज हा ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

6. लेक लाडकी योजना योजना अधिकारी वेबसाईट कोणती आहे?

लेक लाडकी योजना ची अद्याप कोणतीही वेबसाईट सुरू करण्यात आलेली नाही.

7. लेक लाडकी योजना ही योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे?

लेक लाडकी योजना ही फक्त महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे.

8. लेक लाडकी योजना साठी कोण पात्र ठरेल?

लेक लाडकी योजना साठी ज्या कुटुंबाचे राशन कार्ड हे केसरी व पिवळे आहेत अशा कुटुंबातील मुली या योजनेसाठी पात्र ठरतील.

9. लेक लाडकी योजनेची सुरुवात कधी पासून झाली?

लेक लाडकी योजनेची सुरुवात 1 एप्रिल 2023 पासून करण्यात आली.

ALSO READ:~

संजय गांधी विधवा पेंशन योजना

Shadi Anudan Yojana 2023

Shabari Gharkul Yojana Yadi 2023

Anganwadi Bharti Form 2023

Birsa Munda Loan Yojana

Leave a Comment